Free Treatment In Public Hospitals Saam TV
महाराष्ट्र

Free Treatment In Public Hospitals: सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार; सरकारच्या निर्णयाचा कुणाकुणाला मिळणार लाभ?

Free Treatment: भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे.

Ruchika Jadhav

Detail about on Free Treatment in Government Hospitals:

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अशात आता आरोग्य मंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाने एकमताने याबाबत मोठा निर्णय घेतलाय. (Latest Marathi News)

राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital - नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.

सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. गरीब आणि गरजू व्यक्तींना आपल्या आजारांवर उपचारासाठी पैसे नसतात. अशात काही कुटुंबातील तरुण तसेच लहान मुलांना देखील आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा गरजुंसाठी मंत्रिमंडळाने एकमताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT