Ashadhi ekadashi, Warkari, Pandharpur, Beed saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari : टाळ मृदुंगाचा गजर सुरु असतानाच पालखी साेहळ्यात दुचाकी घुसली, महिला वारकरी गंभीर जखमी

राज्यातून वारकरी पंढरीचे दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.

विनोद जिरे

Beed News : बीड जिल्ह्यातील मोरगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात चार वारकरी महिला गंभीर झाल्या आहेत. रविवारी रात्रीच्या सुमरास झालेल्या घटनेनंतर या महिलांवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमी महिलांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी दिली. (Maharashtra News)

आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi) लाखाे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील वेवेगळ्या जिल्ह्यातून सध्या वारकरी पंढरीचे दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.

बीड जिल्ह्यातून देखील संत मुक्ताईची दिंडी पंढरपूरला रवाना झाली आहे. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ संत मुक्ताईची दिंडीत रविवारी रात्री एक दुचाकी घुसली. पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या मुक्ताईच्या पालखीतील चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे (Beed Civil Surgeon Dr. Suresh Sabale) यांनी प्रसंगावधान राखून उपचार करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली होती.

डाॅ. साबळे यांनी स्वतः जखमी वारकरी महिलांवर तात्काळ औषधोपचार केले. दरम्यान सध्या जखमी वारकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT