Four children drowned while swimming in Chhatrapati Sambhajinagar  Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: बराच वेळ झाला गेली कुठे? मुलांना शोधताना पालक हादरले, ४ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथे पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Four children drowned while swimming in Chhatrapati Sambhajinagar:

छत्रपती संभाजीनगर येथे पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे चारही मुलं 12 ते 14 वयोगटातील होती, असं सांगण्यात येत आहे. ही हृदयद्रावक घटना संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्यय (12), अबरार जावेद शेख (12), अफरोज जावेद शेख (14), अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एका 14 वर्षीय मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले गुरुवारी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने पालकांनी तेथे जाऊन पाहिले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली.  (Latest Marathi News)

ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने रांजणगाव (शेणपुंजी) येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आणण्यास मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

SCROLL FOR NEXT