Chandrashekhar Patil Saam TV
महाराष्ट्र

Latur News : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांच्या भावाची आत्महत्या; WhatsApp स्टेटस ठेवत संपवलं जीवन

Chandrashekhar Patil : शिवराज पाटील यांच्या बंगल्यातच चंद्रशेखर पाटील यांनी स्वत: वर गोळी झाडून जीवन संपवलं.

दीपक क्षीरसागर

लातूर : काँग्रेस नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील यांच्या आत्महत्येने लातुरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवराज पाटील यांच्या बंगल्यातच चंद्रशेखर पाटील यांनी स्वत: वर गोळी झाडून जीवन संपवलं.

चंद्रशेखर पाटील चाकूरकर 81 वर्षांचे होते. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात ते राहत होते. दररोज ते सकाळी वॉकला बाहेर जात असत. त्यानंतर ते शिवराज पाटील यांच्या घरी येत असत. हा त्यांचा नियमीत कार्यक्रम होता.

आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. नित्याप्रमाने चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने गोळीचा मोठा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांना चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. (Latest News Update)

चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. वयोमानामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. ते सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते. घरात सून मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी एकांत जागा म्हणून चाकूरकर यांच्या घरातील हॉलमध्ये आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार, चंद्रशेखर पाटील यांची बायपास झाली होती. अशातच अनेक व्याधी जडल्या होत्या. सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केलं असावं.

सकाळी त्यांनी अनेकांना 'गूड बाय' मेसेज केला होता. काहीवेळाने त्यांनी व्हॉट्सअॅपवरही गूड बाय असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT