Shamrao Ashtekar Passes Away  x
महाराष्ट्र

Shamrao Ashtekar : माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, शरद पवारांचा निष्ठावंत सहकारी हरपला

Shamrao Ashtekar Passes Away : महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा मंत्री, कराडचे माजी आमदार आणि शरद पवारांचे समर्थक शामराव आष्टेकर यांचे निधन झाले आहे.

Yash Shirke

  • शामराव आष्टेकर यांचे निधन

  • पुण्यात घेतला शेवटचा श्वास

  • ९१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. १९८५ आणि १९९० अशा प्रकारे दोनदा ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्राच्या क्रीडामंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर शामराव आष्टेकर हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचे काम केले. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. राजकीय कारकीर्दीत त्याने कराड, सातारा परिसरात राजकीय क्षेत्रासह, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.

२ ऑगस्ट १९३४ रोजी साताऱ्यातील कराड येथे शामराव आष्टेकर यांचा जन्म झाला. कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तब्बल १० वर्ष कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सलग दोन टर्म कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.

शामराव आष्टेकर यांनी नऊ वर्षे क्रीडा, सांस्कृतिक आणि उद्योग या विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यांचे ते पालकमंत्री देखील होते. शरद पवार यांचे शामराव आष्टेकर निष्ठावंत कार्यकर्ते होते. भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अशा अनेक संस्थांशी ते संलग्न होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT