बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर राज्य हादरलं होतं. आता पुन्हा एका व्हिडिओमुळे बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धनंजय देशमुख यांच्या साडूकडूनच एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला मारहाण केलं आहे. घरगुती कारणावरून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दादा खिंडकर असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. दादा खिंडकर हा माजी सरपंच असून, धनंजय देशमुख यांचा साडू आहे. त्यांनीच तरूणाला बेदम मारहाण केली होती. आधी तरूणाचे अपहरण केलं. नंतर शेतावर नेत त्याला मारहाण केली. कौटुंबिक वादातून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ २ महिन्यांपूर्वीचा असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मारहाण करत असताना त्या ठिकाणी नाना नावाचा पोलीस देखील आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक गुन्हेगारांच्या घटना घडल्या आहेत. सध्या सतीश भोसले प्रकरणामुळे बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून, त्याला प्रयागराज येथून ताब्यात घेतलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.