यवतमाळमध्ये माजी खासदाराच्या घरावर हल्ला! संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये माजी खासदाराच्या घरावर हल्ला!

यवतमाळमध्ये विदर्भवादी नेते व माजी खासदार दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या निवासस्थानी तोडफोड झाली असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप धोटे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : माजी खासदार तथा विदर्भवादी नेते दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या घरी तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. माजी आमदार विजया धोटे घरी असताना त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. धोटे यांच्या निवासस्थानालगत असलेल्या जागेच्या वादातून हा राडा झाल्याने धोटे यांच्या कन्या ज्वाला धोटे यांनी आक्रमक होत वाघापूर रस्ता बंद केला.

हे देखील पहा -

भाजपचे स्थानिक नेते सुमित बाजोरिया आणि बंटी जयस्वाल यांनी हा हल्ला केल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला असून या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. धोटे यांचे अग्रवाल ले आऊट मध्ये निवासस्थान असून त्यांच्या शेजारील प्लॉट देखील अनेक वर्षांपासून धोटे यांच्या ताब्यात आहे. हा प्लॉट आपल्या मालकीचा असल्याचा फलक सुमित बाजोरिया व बंटी जयस्वाल यांनी पोलीस संरक्षणात त्याठिकाणी लाऊन लोखंडी अँगलचे कंपाउंड केले.

याबाबत माजी आमदार विजया धोटे यांनी जाब विचारल्याने बाजोरिया, जयस्वाल यांच्यासह शंभर जणांच्या जमावाने धोटे यांच्या घरात शिरून विजया धोटे यांना धक्काबुक्की केली तसेच टेबल वरील काच फोडली अशा आशयाची तक्रार पोलिसांना दिली आहे. दरम्यान, या राड्यानंतर धोटे समर्थकांनी बाजोरिया यांनी लावलेले फलक व कंपाउंड तोडून रस्त्यावर फेकले. समर्थकांनी निषेध नोंदवून आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. उशिरा पर्यंत पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात कोणा विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT