Nilesh Rane vs Vaibhav Naik saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane Criticizes Vaibhav Naik: उद्धव ठाकरे, वैभव नाईकचा विषय संपला : निलेश राणे

Veer Savarkar Gaurav Yatra : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावरकर यात्रेची जबाबदारी आमदार नितेश राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : ज्याच घरच डांबर चोरीवर चालत तो कसलं शुद्धीकरण करणार असा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे (nilesh rane news) यांनी आमदार वैभव नाईक (vaibhav naik news) यांना लगावला आहे. वैभव नाईक हा सपशेल फेल गेलेला माणूस असून 2024 नंतर तो पुन्हा राजकारणात दिसणार नाही असेही राणेंनी नमूद केले. (Breaking Marathi News)

भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेवर (Veer Savarkar Gaurav Yatra) टीका करताना वैभव नाईक यांनी सावरकरांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्याकडूनच सावरकर यात्रा काढली जात आहे. ही सावरकर यात्रा नसून अपमान यात्रा आहे. ही यात्रा झाल्यानंतर आपण शुद्धीकरण यात्रा काढणार असल्याचे नाईक यांनी म्हटले हाेते.

दरम्यान सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावरकर यात्रेची जबाबदारी आमदार नितेश राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शुद्धीकरण यात्रा काढणा-यांचा आगामी निवडणुकीत विषय संपला असेल असे प्रत्युत्तर माजी खासदार निलेश राणेंनी वैभव नाईक यांच्या टीकेला दिले.

निलेश राणे म्हणाले वीर सावरकर यांचे नाव घेणं आता उद्धव ठाकरेंना शोभणारा नाही. कारण ते आता काँग्रेस सोबतचं शोभतात. काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीरांसोबतच त्यांनी आता घरोबा केलाय. बाळासाहेबांनी जे जे सांगितलं त्याच्या एकदम उलट उध्दव ठाकरे वागतात.

उध्दव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये तफावत आहे. उध्दव ठाकरे खोटारडे आहेत ते प्रामाणिक नाहीत. जे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले नाहीत ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत काय प्रामाणिक राहतील असा सवालही राणेंनी उपस्थित केला.

त्यामुळे उध्दव ठाकरेंचा सावरकरांबद्दलचा विषय संपलेला आहे. त्यांनी काँग्रेस स्वीकारली आहे. ते आता काँग्रेस वाले झालेले आहेत. त्यांनी आता वीर सावरकरांची काळजी करू नये. आम्ही समर्थ आहोत अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर देखील केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT