Imtiaz Jaleel  Saam tv
महाराष्ट्र

मारहाण आणि हल्ला प्रकरणात जलील यांनी घेतलं भाजप अन् शिंदेंच्या नेत्याचं नाव

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी थेट भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Vishal Gangurde

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा

इम्तियाज जलील यांना मारहाण

जलील यांच्याकडून अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप

महापालिका निवडणुकीदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाण झाली आहे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी कारमध्ये बसलेल्या इम्तियाज जलील यांचा हात ओढून मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या मारहाणीत इम्तियाज जलील यांनी भाजपचे अतुल सावे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुऱ्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याचे समोर आलं आहे. बायजीपुऱ्यात पदयात्रा काढत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर कारने जाताना अडवून हमरीतुमरी होऊन दोन गटात हाणामारी झाली. यावेळी जलील यांच्या कारवर हल्ला करताना पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. या घटनेवर इम्तियाज जलील यांनी भाष्य करत सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केलेत.

मारहाणीच्या घटनेवर भाष्य करताना जलील म्हणाले, ' त्यांच्याकडे हिरवे झेंडे नव्हते. त्यांच्याकडे काळे झेंडे आले असेल. राजकारणात असे प्रकार होतच असतात. मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही. लोकशाहीत माझा अधिकार आहे की, कुठे जायचं, कुठे पदयात्रा काढायची. मी करत आहे. याबद्दल कुणाला आक्षेप असेल, मी येऊ नये. आमचा उमेदवार आहे. आम्ही पदयात्रा करत राहू'.

'१६ जानेवारीला निकाल आल्यावर कळेल. काळ्या आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ निकालाच्या दिवशी कळेल, असेही ते म्हणाले.

'१३ आणि १४ प्रभागात आमची रॅली होती. त्याची परवानगी घेण्यात आली होती. अचानक २५ ते ३० लोक रॅलीत घुसले. त्यांनी कार्यकर्त्यांना मारायला सुरुवात केली. त्यांच्या फायटर आणि चाकू होते. एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. माझी गाडी फोडण्याची त्याची तयारी होती. हे गुंड लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या सांगण्यावर खेळ करत होते. त्यांना वाटतंय की, सत्ताधारी नेत्यांच्या पाठिंब्यामुळे गुंडागर्दी करत आहे. आम्ही सर्व प्रकरण पोलिसांवर सोडत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT