Nanded Politics Saam tv
महाराष्ट्र

Nanded Politics : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; नांदेडमधील बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम, लवकरच तुतारी फुंकणार?

Vishal Gangurde

नांदेड : ऐन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार अजून निश्चित झाले नसले तरी अनेक अनेक नेते राजकीय कोलांटउड्या मारताना दिसत आहेत. याच राजकीय कोलांटउड्या नांदेडमध्येही दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातही उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. याचदरम्यान, नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. साबणे यांनी भाजपच्या प्रदेशा कार्यकारणी सदस्यत्वाचा आणि इतर सर्व सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. साबणे यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर साबणे हे देगलूर येथे कार्यरकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते राजकीय दिशा ठरवणार आहेत. सुभाष साबणे हे सेनेचे आमदार होते.

मागील वेळेस झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या तिकीटावर देगलूर विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होाता. त्यानंतर आता ते माजी आमदार सुभाष साबणे हे लवकरच हातात तुतारी घेणार की पुन्हा घर वापसी करून हातात मशाल घेणार हे जाहीर करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

समीर भुजबळ तुतारी फुंकणार?

मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळ अपक्ष किंवा तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. महायुतीत या मतदारसंघात शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहेत. समीर भुजबळ हे शरद आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्क करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना तुतारी किंवा अपक्ष असे दोन्ही पर्याय समीर भुजबळ समर्थक करत असल्याची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics: सिल्लोडचं महाभारत ! अब्दुल सत्तारांना ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांचं आव्हान

Maharashtra Election: मनोज जरांगेंचा उद्या अंतिम फैसला; कुणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?

Nushrratt Bharuccha: नुसरतच्या किलर लूकने उडवली सर्वांची झोप

Sunday Horoscope: रविवार 'या' 5 राशींसाठी ठरणार शुभ, देवी लक्ष्मीची होणार कृपा

Assembly Election: डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसची धावाधाव? डॅमेज कंट्रोलसाठी 'मातोश्री'वर चेन्नीथला

SCROLL FOR NEXT