Ramdas Kadam , Sanjay Kadam, Kokan Political News  saam tv
महाराष्ट्र

Kokan Political News : उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर; 'कृतघ्न लोक कोकणात जन्माला आली'

कोकणातील दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आगामी काळात संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश कोळी

Kokan Political News : हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि उद्या निवडणूक घ्या असे आव्हान माजी आमदार संजय कदम (former mla sanjay kadam) यांनी आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) यांना दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या (uddhav thackeray) एबी फॉर्मवर निवडून आलेल्या योगेश कदमांना मतोश्रीची (matoshree) आठवण येते आणि बाप नेत्यांवर टीका करतो असा समाचार संजय कदम यांनी रामदास कदमांचा (ramdas kadam) घेत पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

कोकणातील दापोली विधानसभा मतदार संघातील राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे दोन दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राजीनामा देऊन मैदानात या

त्यांच्या या पक्ष प्रवेशावरून विद्यमान आमदार योगेश कदम यांनी केलेल्या टीकेला गुरुवारी संजय कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले योगेश कदम यांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व एकनाथ शिंदे यांच्याकडून एबी फॉर्म घेऊन उद्या निवडणूक लावावी असे आव्हान दिले आहे.

आमदार योगेश कदम हे माध्यमांना प्रतिक्रिया देताना मातोश्रीची आठवण येते असे म्हणतात तर त्यांचे वडील त्याच मातोश्रीतील पक्ष प्रमुखांवर टीका करतात. मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार म्हणून माझी राजकीय आत्महत्या असल्याची टीका करणारे आमदार योगेश कदम यांनी निवडणुकीला सामोरे जावे म्हणजे आत्महत्या नक्की कोणाची झाली हे लक्षात येईल असा टोला देखील संजय कदम यांनी लगावला आहे. (Maharashtra News)

रामदास कदमांचा इशा-याला प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खेड येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यानंतर आपण 19 मार्च रोजी प्रत्त्युत्तर सभा घेऊन व्याजासकट परतफेड करण्याचा इशारा दिला आहे. याच इशाऱ्याला आता शिवसेनेत पक्ष प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी प्रत्त्युत्तर दिले. तुम्ही प्रत्त्युत्तर सभा घेतलीत तर आम्ही सुद्धा त्याची परतफेड केल्याशिवाय शांत राहणार नाही असा इशाराच संजय कदम यांनी रामदास कदम यांना दिला आहे.

रामदास कदमांसारखे कृतघ्न लोक कोकणात जन्माला आली हे पाप झालं आहे. कोकणातील जनतेने तुम्हाला नाकारलेले आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी स्वतःची पत सांभाळून इतरांवर टीका करावी असा सल्ला देखील माजी आमदार संजय कदम यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांची राज्यातील पहिली सभा कोकणातील खेड येथे होणार असून संपूर्ण राज्यातून या सभेला निष्ठांवत शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे कुटुंबाच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणाऱ्या रामदास कदम यांना जनता विसरलेली नाही. भविष्यातील निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय येईल असेही संजय कदम यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT