Vasantrao Naik Saam Tv
महाराष्ट्र

Agriculture Day: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून होणार साजरा

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून होणार साजरा

साम टिव्ही ब्युरो

Vasantrao Naik: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. शासनाने याबाबतचा शासन निर्णय काढला आहे.

हा दिन साजरा करण्यासाठी पंचायत समितीना १० हजार तर जिल्हापरिषद मुख्यालयात कृषी दिन साजरी करण्यासाठी २० हजार दिले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी दिनानिमित्त प्रत्येक पंचायत समितीकरीता जास्तीत जास्त रु.१०,०००/- (रु. दहा हजार फक्त) यानुसार ३५५ पंचायत समित्यांकरिता रु.३५,५०,०००/- (रु. पस्तीस लाख पन्नास हजार फक्ता तसेच जिल्हा परिषद मुख्यालयी कृषिदिन साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकरीता रु.२०,०००/- (रु. वीस हजार फक्त या प्रमाणे एकूण ३४ जिल्हा परिषदांकरीता रु.६,८०,०००/- (सहा लाख ऐशी हजार फक्त) अशा एकूण रु. ४२,३०,०००/- (रुपये बेचाळीस लाख तीस हजार फक्त) एवढया खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. (Latest Marathi News)

कृषी दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधितांना द्याव्यात, असे शासनाने सांगितले आहे. कृषी आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांतील बाबीवर खर्च करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा, असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतीसाठी अनेक योजना आखल्या आणि कार्यान्वीत केल्या. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragi Or Oats: नाचणी की ओट्स वजन कमी करण्यासाठी काय ठरेल बेस्ट

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

SCROLL FOR NEXT