shivsena leaders gives letter to neelam gorhe  saam tv
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी? उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलं पत्र

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी प्रलंबित असतानाही आता शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Ambadas Danve) अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस एका पत्राद्वारे केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांच्या नियुक्तीच्या शिफारसीचे पत्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना दिले आहे. शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्याही नावाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना प्रमुख यांनी पत्रात असं म्हटलंय की, शिवसेना विधिमंडळ पक्षाची ९ जुलै २०२२ रोजी बैठक झाली. या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांची नियुक्ती करण्याबाबत आपणास शिफारस करत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना बारामती मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदाराच्या पुत्रासह ७ नेत्यांची हाकलपट्टी; एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई

Cotton Candy : कॉटन कँडीचा रंग बदलला! FDA च्या कारवाईनंतर विक्रेत्यांनी घेतला मोठा निर्णय

Kitchen Hacks : चहाची गाळणी काळी पडलीय? 'या' सोप्या ट्रिकने चुटकीसरशी नव्यासारखी चमकेल

Curd and vegetables: रायत्यासोबत या ३ भाज्या खाणं ठरू शकतं धोकादायक! एकाचा तर तुम्ही दररोज बनवता

SCROLL FOR NEXT