Beed Crime News 
महाराष्ट्र

Beed : खोक्या भाईच्या घरी वन अधिकाऱ्यांची धाड, प्राण्याच्या मांसासोबत गांजा मिळाला

khokya Satish bhosale : वन विभागाच्या धाडीमध्ये सुकं मांस, प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या अन् गांजा हस्तगत केला आहे. वन विभागाकडून खोक्याच्या मुसक्या आवळण्याची कारवाई सुरू झाली आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद

Beed Crime News : बीड शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाने हालचाली सुरू केलया आहेत. वन अधिकाऱ्यांनी आज खोक्या भाईच्या घरी धाड टाकलून झाडाझडती घेतली. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले. त्याशिवाय जाळ्या अन् गांजाही आढळला आहे. हरीण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला मिळाल्या आहेत.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश भोसले याचे नवीन कारनामे समोर येत आहेत. सतीश भोसले याने अनेक वन प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर येथील घराचे आज वनविभागाने पोलिसांच्या विभागाकडून झडती घेण्यात आली.

खोक्याच्या घरी काय काय सापडले?

वन विभागाने घेतलेल्या झडतीमध्ये सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर चित्र पकडण्याचे जाळे, एक सतुर, एक सुरी, एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आली आहे दोन पुड्या गांजा आढळून आला आहे. 400 ते 500 ग्राम गांजा असेल पुडी आढळली आहे. घरात वाळलेले मांस आढळून आले आहे. ही कार्यवाही वनविभागाने केली आहे.

ही कार्यवाही विभागीय व अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्राधिकारी श्रीकांत काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रड, आष्टी वनपरिक्षेत्र विभागाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ ते पथक सर्व स्टाफ त्यासोबत वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते. भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT