pandharpur wari, pandharpur, ashadhi wari 2022, sweets, pedha, food and drugs saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 : भेसळयुक्त १५० किलो पेढा जप्त; मिठाई विक्रेत्यावर गुन्हा दाखल

ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व यु. एस. भुसे यांनी सिंहगडच्या अन्न सुरक्षा स्वयंसेवकांसोबत पुर्ण केली.

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या (ashadhi wari) पार्श्वभूमीवर पंढरपूर (pandharpur) येथे अन्न व औषध प्रशासन विभाग (food & drugs department) सतर्क झाले आहे. या विभागाने विविध खाद्य पदार्थ आणि मिठाई विक्रीच्या (sweet mart) दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान अधिका-यांनी साठ हजार हजार रुपये किंमतीचा सुमारे एकशे पन्नास किलो भेसळयुक्त पेढा आणि इतर साहित्य जप्त करुन ते नष्ट केले. या प्रकरणी संबंधित मिठाई विक्रेत्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिका-यांनी दिली. (ashadhi wari 2022 latest marathi news)

पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्त विविध जिल्ह्यातून पालख्या येतात. या पालख्यांबराेबर माेठ्या संख्येने वारकरी येत असतात. या निमित्त अनेकांनी पेढ्यांची दुकाने थाटली आहेत. दरम्यान पालखी साेहळ्यात वारक-यांची काळजी प्रशासन विविध पातळ्यांवर घेत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने त्यांना मिळालेल्या माहितीनूसार काही मिठाई विक्री करणा-या दुकानांची अधिका-यांनी तपासणी केली असता तेथे भेसळयुक्त पेढे असल्याचे निदर्शनास आले. या पेढ्यांमध्ये स्टार्च मिसळल्याचे दिसून आले. या विक्रेत्यांकडून सुमारे 150 किलो पेढा जप्त करण्यात आला आला.

हा पेढा भेसळ युक्त असल्याने ताे अधिका-यांनी जागेवरच नष्ट केला. या प्रकरणी संबंधित मिठाई विक्रेत्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व यु. एस. भुसे यांनी सिंहगडच्या अन्न सुरक्षा स्वयंसेवकांसोबत पुर्ण केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT