chandrapur, Chandrapur Rain Updates  Chandrapur Rain Updates
महाराष्ट्र

Chandrapur Rain Updates : करंजी गावातील 150 पेक्षा अधिक घरे पाण्यात, आक्सापूरचा तलाव फुटला

Latest news on Chandrapur Rain: दरम्यान वित्तहानीची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.

संजय तुमराम

Chandrapur News :

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे करंजी गावच्या नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. तसेच मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील तलाव फुटला. यामुळे लगतची शेती जलमय झाली आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव पुराच्या विळख्यात सापडल्याने गावातील शेकडो घरात पुराचे पाणी शिरले आहे. या पाण्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारच्या रात्री गोंडपिपरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला.

या पावसामुळे लहान-मोठया नाल्याना पूर आला. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या करंजी गावात नाल्याचा प्रवाह शिरल्याने रस्त्यावर, घरात पाणीच पाणी दिसू लागले आहे. यामुळे गावाकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. हे गाव माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे जन्म गाव आहे.

पाण्यामुळे घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी सामान आणि शेतीला लागणाऱ्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाचे अधिकारी गावात दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

तलाव फुटला

मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यात आक्सापूर येथील तलाव फुटला. यामुळे लगतची शेती जलमय झाली आहे. बाजूलाच असलेले बोरगावही प्रभावित झाले आहे. तलावाच्या पाण्याने बोर्गावला वेढले असून येथील शेतीसुद्धा पाण्याखाली आहे. प्रशासनाची टीम गावात पोचली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वित्तहानीची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT