भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा भारत नागणे
महाराष्ट्र

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने प्रशासनाला दिले आहेत.

हे देखील पहा-

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण काल शंभर टक्के भरले आहे. त्यानंतरही उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे. यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. भीमा नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे असा इशारा ही प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.

उजनी धरण परिसरात अति मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.पाऊस कमी न झाल्यास या विसर्गात अजून वाढ करावी लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT