पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  Saam tv
महाराष्ट्र

पाच मित्रांचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

याबाबत पीडितीने गुरुवारी (१ जुलै) रात्री उशिरा आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

आळेफाटा :  फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार (Rape)केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील (Junnar) आळेफाटा (Aalefata) परिसरात घडली आहे. याबाबत पीडितीने गुरुवारी (१ जुलै) रात्री उशिरा आळेफाटा पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Five friends gang-rape 14-year-old girl)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेत. तिचे फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. तरुणीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पाच मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी पीडितीचे तक्रारीवरून निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे,यश गाडेकर सर्वांचे वय २८ वर्षापेक्षा अधिक राहणार आळेफाटा परिसर यांच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपीसह एक आलिशान वाहन ताब्यात घेतले असून असून एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार पुढील तपास करत आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT