fishermen morcha in ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri: हजाराे मच्छिमारांनी मंत्रालयावर माेर्चा काढण्याचा दिला इशारा

पर्सेसिन मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा 

अमोल कलये

रत्नागिरी : राज्य सरकारनं (maharashtra government) काढलेला नवा मच्छीमारी कायदा हा मच्छीमारांसाठी मारक आहे. या विरोधात रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील पर्सेसिन मच्छिमारांनी (fishermen) आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सुमारे चार ते पाच हजार मच्छिमार सहभागी झाले होते. (ratnagiri latest marathi news)

आम्हांला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महीने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छिमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारनं पुन्हा एकदा विचारा करावा अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत (mumbai) मंत्रालयावर (mantralay) धडकू असा थेट इशारा मच्छिमारांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा (morcha) येताच हजाराे मच्छिमारांनी समुद्र आमच्या हक्काचा नाही काेणाच्या बापाचा...हमसे जाे टकराएगा मिट्टी मी मिल जाएगा अशा घाेषणांनी परिसर दणाणून साेडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT