Breaking: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग; 10 मृत्यू, 6 गंभीर (पहा Video) सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Breaking: अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग; 10 मृत्यू, 6 गंभीर (पहा Video)

जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून 10 जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती मिळत मिळत आहे.

सचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून अकरा जण होरपळले असल्याची प्राथमिक माहिती मिळत मिळत आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज सकाळी ही आग लागली आहे. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ICU विभागाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आहे. मात्र अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलावताना सिव्हिल कर्मचारी यांची धावपळ झाली आहे. माहितीनुसार, २० रुग्ण या ICU विभागात असल्याचे बोलले जात आहे.

तर आगीतून काही रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना सुरक्षित काढण्याचे कार्य सुरु आहे. अतिदक्षता विभाग आला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. त्यामुळे रुग्ण भाजले गेले अशी प्राथमिक माहिती आहे

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग... (पहा Video)

तर, घटनेबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबद्दल दखल घेत ते तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघणार तेथे भेट देणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ याची माहिती दिली आहे. हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की, आगीचे कारण स्पष्ट झाल्यावर आग कोणामुळे लागली यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि माहिती त्यांनी दिली मृत्यू पावलेल्यांना तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आहे.

मृतांची नावे;

रामकिसन विठ्ठर खरपुडे (70), सिताराम दगडू जाधव (83), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (65), कडुबाई गंगाधर खाटीक (65), शिवाजी सदाशिव पवार (82), दिपक विश्वनाथ जेडगुले, धोंडाबाई मधुकर कदम (70), आसराबाई नांगरे( 58), छबानी अहमद सय्यद (64) अशी 9 जणांची नावे आहेत, तर एकाची ओळख पटलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Stabbed to Death: युद्धातून जीव वाचवून अमेरिकेत आली; ट्रेनमध्ये हल्लेखोराने चाकू भोसकला Video Viral

Men Hair Care: मुलांनी दररोज केस धुवावे का?

Banjara Community: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; नाहीतर बंजारा समाज रस्त्यावर उतरून लढाई लढेल|VIDEO

Maharashtra Live News Update: : - विसर्जनाच्या रात्री पुणे मेट्रोत तुफान गर्दी

Ganpati visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्येचा थरार, तरुणावर चाकूने वार; घटनेचा Video Viral

SCROLL FOR NEXT