Nagpur Fire  संजय डाफ
महाराष्ट्र

फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये भीषण आग; वृद्धाचा होरपळून मृत्यू

फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला

संजय डाफ

नागपूर : फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये आग लागून एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील काटोलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नूर महम्मद बोधर असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव असून ते ८८ वर्षांचे होते. काटोलमधील संचेती लेआऊटमध्ये आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास सलीम फर्निचरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली.

हे देखील पाहा-

इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग (Fire) लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण आगीत ८८ वर्षीय नूर महम्मद बोधर यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मात्र, वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार फर्निचर (furniture) तसेच लाकूड असल्याने २ तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.

२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली आहे. या आगीत वर्कशॉपची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT