fire broke in a house near yavatmal saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: गॅस सिलेंडरच्या स्फोटात अयाता गावातील जयस्वाल माय-लेकींचा मृत्यू

ही आग विझविण्यासाठी माेठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी धावले.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : पारवा पाेलिस ठाण्याच्या हद्दीमधील अयाता (ayata) येथील घरास लागलेल्या आगीत (fire) गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे या घटनेत आई (mother) आणि मुलीचा (child) जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. (yavatmal fire latest marathi updates)

पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आयता येथील एका घरास आग लागली. ही आग माेठ्या प्रमाणावर भडकल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. त्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान या आगीत काजल विनोद जयस्वाल आणि परी विनोद जयस्वाल या माय लेकींचा हाेरपळून मृत्यू झाल्याने परिसरात शाेककळा पसरली आहे. सध्या आगीवर नियंत्रण आले असले तरी धाेका टळला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

SCROLL FOR NEXT