Virar Fire News, Electric Bike Showroom  saam tv
महाराष्ट्र

Virar Fire News : इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग, विरारच्या पश्चिम भागात रहिवाशांची धावाधाव

Dongarpada Road Virar : फायरब्रिगेड तातडीने घटनास्थळी पाेहचले.

चेतन इंगळे

Virar News : विरार येथे एका इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूमला आग लागली. ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. (Maharashtra News)

विरार (virar) येथील पश्चिम भागातील डोंगरपाडा रोड वरील एका इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या शोरूमला आज (बुधवार) सकाळी दहा वाजता भीषण स्वरुपाची आग लागली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (fire brigade) दोन गाड्या दाखल झाल्या. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या शोरूम मधल्या अनेक इलेक्ट्रिक बाइक्स जळून खाक झाल्या आहेत. ही आग (fire) शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT