Latur Farmer Harassment: Finance Company Agent Faces Allegations saam tv
महाराष्ट्र

फायनान्स कंपन्यांचे पाठीराखे कोण? महिला एजंटची शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ

Latur Farmer Faces Alleged Harassment by Finance Company : फायनान्स कंपन्यांकडून दुष्काळग्रस्तांच्या छळाची मालिका काही थांबायला तयार नाही.लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या महिला एजंटनं दुष्काळग्रस्तांसोबत संतापजनक प्रकार केलाय. काय आहे हा प्रकार? या कंपन्यांचा पाठिराखा कोण आहे? यावरचा हा रिपोर्ट.

Girish Nikam

  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा प्रश्न पुन्हा चर्चेत.

  • फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह.

  • कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप.

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या फायनान्स कंपन्यांची मुजोरी कायम असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतरही दुष्काळग्रस्तांकडे वसुलीचा तगादा सुरुच आहे. त्याही पुढे जाऊन आता शेतकऱ्याला अगदी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार लातूरमध्ये समोर आलाय. रेणापूर तालुक्यातील खलंगरी गावातले शेतकरी सतीश बोळंगे यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं.

हफ्ते थकल्यामुळे कंपनीच्या महिला एजन्टने सतीश यांचे भाऊ आणि कर्जासाठी जामिनदार असलेल्या गजानन बोळंगे यांना फोन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, वसुलीसाठी आलेले एजंट सरकारलाही जुमानत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते गजानन बोळंगे यांनी केलाय. या गंभीर प्रकारानंतर साम टीव्हीच्या प्रतिनिधीने थेट रेणापूर तालुका गाठून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली.

खलंगरी गावात फायनान्स कंपनीचा एजंट कर्जवसुलीसाठी पोहोचला होता. मात्र, साम टीव्हीचा कॅमेरा दिसताच संबंधित एजंटने घटनास्थळावरून पळ काढला.

दुष्काळी परिस्थितीतही ग्रामस्थांकडे कर्जवसुलीसाठी छळ सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याआधीही लातूरमधील ममदापूरमध्ये फायनान्स कंपनीनं एका अल्पभूधारक शेतमजुराचे घर सील केलं होतं. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं दखल घेत घराचं सील तोडण्यात आलं. तर नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या कंपन्यांची दहशत कधी थांबणार ? वसुली थांबवण्याचे आदेश असतानाही मुजोरी कायम असेल तर या कंपन्यांचे पाठीराखे कोण? हा सवाल उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अलिबागच्या रस्त्यावर यम फिरतोय; वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव

मराठवाड्यात पाणीटंचाई की टँकरचा गोरखधंदा? कृत्रिम पाणीटंचाईनं टँकर माफिया मालामाल?

Weather Update: 'अकवान' चक्रीवादळाचं रौद्ररूप; 100 Kmph वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट, 'या' राज्यांमध्ये धो-धो कोसळणार पाऊस

Gratuity : ५ वर्षांच्या आत नोकरी सोडली तरीही ग्रॅच्युइटी मिळेल, उच्च न्यायालयाच्या महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन वेतन नियम लागू; आठवड्यात किमान ४८ तास काम, सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट पगार

SCROLL FOR NEXT