अखेर अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये भारत नागणे
महाराष्ट्र

अखेर अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचे रुपांतर आता नगर परिषदेमध्ये करण्यात आले आहे.

भारत नागणे

अकलूज : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीसह माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदे मध्ये रूपांतर करावे या मागणीसाठी अकलूजकरांनी राज्य सरकारच्या विरोधात दोन महिन्यांपासून उपोषण सुरू केले होते. त्यानंतर आज राज्य सरकारने ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेत अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसा अध्यादेश ही राज्य सरकारने आज पारित केला आहे.

हे देखील पहा -

अकलूज नगरपरिषदेवर माळशिरस तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज माळेवाडी, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग या ग्रामपंचायतींचे नगर परिषद व नगरपंचायती मध्ये रूपांतर करावे असे ठराव शासनाकडे दिले होता. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ग्रामपंचायतींचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली होती.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अकलूज माळेवाडी, नातेपुते ग्रामपंचायतीचा प्रस्ताव शासन दरबारी रखडला होता. राज्यातील अन्य ग्रामपंचायतींचे नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र, अकलूज माळेवाडी चा प्रस्ताव रखडला होता. यातूनच येथील ग्रामस्थांनी या मागणीसाठी सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सलग दोन महिने हे आंदोलन सुरू होते. आज या आंदोलनाला यश आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT