Parbhani saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : झोला पिंपरीच्या देवी अनुसया संस्थानच्या मठाधीपतींवर गुन्हा दाखल करा; ग्रामस्थांची मागणी

तहसीलदार प्रदीप शेलारांची ग्रामस्थांना उपाेषण साेडण्याची विनंती.

राजेश काटकर

Parbhani News : गंगाखेड तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील श्री देवी अनुसया माता संस्थानचे काम पाहणाऱ्या संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्रगिरी महाराज यांच्यावर गंभीर आराेप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थ मठासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. (Maharashtra News)

श्री देवी अनुसया माता मठाचे काम पाहणारे ट्रस्ट बरखास्त करून परंपरेनुसार गादीवर बसलेल्या नरेंद्रगिरी महाराजांचे शिष्य चिरंजीव गिरी महाराज यांना पूजेचा मान द्यावा आदी मागण्यांसाठी गोवंश रक्षक अजय भिसे हे श्री देवी अनुसया माता संस्थान मठासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

तहसीलदार प्रदीप शेलार यांनी पिंप्री गावात जाऊन उपोषणार्थी (fasting) अजय भिसे यांच्यासह ग्रामस्थांची चर्चा केली तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली. तेव्हा मठाधीपती सुरेंद्रगिरी यांच्या चुकीच्या कारभाराचा ग्रामस्थांनी पाढा वाचला. तसेच त्यांच्या अरेरावीच्या भाषेचा निषेध नाेंदविला.

दरम्यान त्यानंतर पिंप्री गावातील ग्रामस्थ व महिलांनी बेमुदत उपोषणाला पाठींबा दर्शवित उपोषणस्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संस्थानच्या अध्यक्षांनी केलेल्या गैरकृत्याची चाैकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आजही अजय भिसे व वैभव कुरुडे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT