amravati congress demands to file case on navneet rana controversial statement in telangana Saam Digital
महाराष्ट्र

Navneet Rana Controversial Statement: “काँग्रेसला मतदान करणं म्हणजे…”, नवनीत राणांवर गुन्हा दाखल करा; अमरावतीत काॅंग्रेस आक्रमक

Amravati Marathi News : मतदाता आपल्या विवेक बुद्धीने मतदान करायला जाताे. परंतु राणा सारख्या नेत्यांनी निषेर्धाह वक्तव्य करुन मतदात्यांचा देखील अपमान केला आहे असे काॅंग्रेस नेत्यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- अमर घटारे

काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं या भाजप खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा आज (शनिवार) अमरावती येथे काॅंग्रेसने निषेध नाेंदविला. काँग्रेस नेते किशोर बोरकर यांनी राणा यांच्या वक्तव्याबाबत राजापेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Maharashtra News)

किशोर बोरकर म्हणाले अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद मध्ये वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे मतदात्यांचा अपमानास्पद हाेईल असेच आहे. मतदाता आपल्या विवेक बुद्धीने मतदान करायला जाताे. परंतु राणा सारख्या नेत्यांनी निषेर्धाह वक्तव्य करुन मतदात्यांचा देखील अपमान केला आहे.

बाेरकर पुढं बाेलताना म्हणाले तेलंगणा येथे राणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध नाेंदवून आज राजापेठ पाेलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली आहे. राणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाेरकर यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT