कालिचरण महाराजाविरोधात वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू! SaamTVnews
महाराष्ट्र

कालिचरण महाराजावर गुन्हा दाखल करा; वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केले होते आक्षेपार्ह वक्तव्य!

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : कालीचरण महाराज याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महात्मा गांधीजींच्या कर्मभूमी असलेल्या वर्धेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कालिचरण विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वर्धा पोलीस अधीक्षक यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. वर्धा (Wardha) शहर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हे (Case) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हे देखील पहा :

छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसदेत या कालिचरण (Kalicharan Maharaj) महाराजाने महात्मा गांधी यांच्या (Mahatma Gandhi) विरोधात अत्यंत आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य केले होते. या वक्तव्यांनंतर देशभरात त्याच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला व विविध ठिकाणी त्याच्या या वक्तव्याविरोधात तक्रारी दाखल होत आहेत.

रायपूर (Raipur) मध्ये धर्म संसदेत (Dharm Sansad) केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण देशात या वक्तव्याचा निषेध आणि विरोध नोंदवला जात असतानाच त्याचे पडसाद आता वर्धेत दिसू लागले आहेत. काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन व निदर्शने केली. कालीचरण विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना तक्राराचे निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शहर ठाण्यात सुरू झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

SCROLL FOR NEXT