maval, dahuli, tantamukti, grampanchayat sabha saam tv
महाराष्ट्र

तंटामुक्त पदाधिकारी निवडीवरुन ग्रामसभेत झाला राडा; सभेतून सरपंचांनी काढला पळ

हा निर्णय याेग्य नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी ग्रामसेवकापुढं मांडली.

दिलीप कांबळे

मावळ : मावळ येथील डाहुली (dahuli) गावातील (village) ग्रामस्थ सरपंचाच्या मनमानी कारभारा विरोधात आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सरपंच यांनी मनमानी निर्णय घेऊन ग्रामस्थांवर (villagers) लादल्याने ग्रामस्थांनी थेट ग्रामसेवकास घेराव घातला.

ग्रामसभेत ग्रामस्थांच्या संमतीने निर्णय घेतले जातात. परंतु डाहुली येथे सरपंच यांनी तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ग्रामस्थांचा विरोध असताना केली. स्वतःच्या मर्जीने सरपंच यांनी निर्णय घेतल्याने ग्रामसभेत गदारोळ झाला.

यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून सरपंच यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकास घेराव घातला. हा निर्णय याेग्य नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी मांडली. दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या निवड़ीवरूनच डाहुली गावात तंटा सुरु झाल्याची चर्चा मावळात रंगू लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT