गावगाड्याच्या मिनी विधानसभेच्या अधिवेशनात दोन गटात राडा
गावगाड्याच्या मिनी विधानसभेच्या अधिवेशनात दोन गटात राडा संजय राठोड
महाराष्ट्र

गावगाड्याच्या मिनी विधानसभेच्या अधिवेशनात दोन गटात राडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - आपण नेहमी बघतो विधानसभा किंवा लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये सभागृहात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यवतमाळ मधील झरी जामनी तालुक्यातील निंबादेवी येथील मिनी विधानसभेच्या अधिवेशनात चक्क दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. झरी जामनी तालुक्यातील निंबादेवी येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

हे देखील पहा -

त्या ग्रामसभेमध्ये दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये घडल्याने मोठी खळबळ उडाली. ग्रामसेवकाने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सूचना गावकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ग्रामसभेला सुरुवात होताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचा ठराव घेण्याचा आग्रह काहींनी धरला होता. त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदवला.

हा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा झाला. या घटनेनंतर नागरिकांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिंगला भीमराम टेकाम, लक्ष्मी गेडाम, मनीषा आत्राम यांना ग्रामसभेत धक्का बुक्की झाली. ग्रा.प.सदस्य अनिल गेडाम यांना कॉलर पकडून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी उपसरपंचासह सहकाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. सदर घटनेची तक्रार पाटण पोलीसांनी तपासात ठेवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी अपडेट; वाहनाची टाकी फुल करण्याआधी वाचा आजचे दर

Special Report : Amol Kolhe | हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार? संसदेत कोल्हे जाणार की आढळराव?

Special Report : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Shirur Loksabha: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद; २४ तासांनंतर पुन्हा सुरू

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये वीज पडून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT