Crime News Saam TV
महाराष्ट्र

Jalna : पाटोदा मावा गावात दोन गटात मारहाण; सरपंचासह इतरांवर जीवघेणा हल्ला

अवैध व्यवसाय बंद करा अशी मागणी करताच अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकाकडून सरपंच सहित इतर जनावर जीवघेणा हल्ला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jalna Crime News : पाटोदा मावा गावात दोन गटात तुंबळ मारहाण झाल्याची घटना सामोर आली आहे. तर या मारहाणीत दोन्ही गटातील ९ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जालन्यातील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या मारहाणीत सपंचासह एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस (Police) ठाण्यात दोन्ही गटाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाटोदा मावा गावात सरपंच हरिभाऊ खवल यांनी अवैध सुरू असलेल्या व्यवसायाविरुद्ध कारवाई केल्याची मागणी केल्याने शिंदे गटाकडून सरपंचासह इतर जणांना लाठ्याकाठ्या आणि हतोड्याने मारहाण करण्यात आल्याची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या तक्रारी वरून पोलिसांनी शिंदे गटातील पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर शिंदे गटांनी मूकबधिर आरटीआय कार्यकर्ता असलेल्या संभाजी शिंदे यांनी शासनाकडून दिव्यांगासाठी असलेला पाच टक्के निधीबाबद माहितीचा अधिकार टाकला म्हणून याचा राग मनात धरून सरंपच कांचन खबल यांचे पती हरी खबल यांच्या सह तिघांनी मुकबधीर संतोष शिंदे याला मारहाण केली.

दरम्यान, या दोन्ही गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत सरपंच पती हरी खवल यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. तर शुभम खवल, रमेश खवल यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दादरा नगर हवेलीत मोठी दुर्घटना! नायट्रोजन गॅसच्या गोदामात स्फोट, ४ ठार; ५ जखमी

Nose Pin Designs: ट्रेडिशनल ते मॉडर्न, नोज पिनच्या या 5 डिझाईन्स दिसतील खूपच सुंदर

पुणे हादरले! 7 वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

Maharashtra Live News Update : बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात! जांभुळवाडी दरी पुलाजवळ दोन ट्रेलरची धडक

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT