amravati, dengue saam tv
महाराष्ट्र

साथीच्या आजाराने 5000 नागरिक त्रस्त, लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हा : जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

Fever, Cold & Cough : महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रावरही याच आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : मागील आठवडाभरात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा मानवी शरीरावर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सध्या सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. (Breaking Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालय असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एका आठवड्यात 5000 रुग्ण सर्दी ,ताप खोकल्याचे असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रावरही याच आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

यामध्ये लहान मुलांमध्ये खोकला व तापाचे आजार वाढल्याचं दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात डेंग्यू आजाराने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढला आहे. दरम्यान नागरिकांनी अंगावर ताप न काढता तात्काळ रुग्णालयात येऊन उपचार घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावात देखील डेंग्यूने कहर केला आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आराेप ग्रामस्थ करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT