बीडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून, वनरक्षक जवानाची आत्महत्या Vinod Jire
महाराष्ट्र

बीडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून, वनरक्षक जवानाची आत्महत्या

आजपर्यंत आपण पतीच्या त्रासाला कंटाळून, पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र बीडच्या आष्टीमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून, एका वनरक्षक असणाऱ्या पतीनेच, आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - आजपर्यंत आपण पतीच्या त्रासाला कंटाळून, पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र बीडच्या आष्टीमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून, एका वनरक्षक असणाऱ्या पतीनेच, आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल आबासाहेब जगताप असे आत्महत्या केलेल्या त्या तरुण वनरक्षकाचे नाव आहे. Fed up with wife's harassment in Beed, forest guard commits suicide

हे देखील पहा -

लग्नाच्या अगोदर खर्च केलेल्या पगाराचा हिशोब द्या. असा तगादा पत्नीने वनरक्षक असलेल्या पती अनिल जगतात यांच्या मागे लावला होता. तसेच आई-वडिलांना पैसे दिल्यामुळे तिने त्याला मारहाणही केली होती. अनिलच्या नवे असणारी शेती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी ती त्याला सतत त्रासही देऊ लागली.

पत्नीच्या याच नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या पती अनिल जगताप यांनी, 29 मे रोजी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी 24 दिवसांनंतर पत्नी अश्विनी अनिल जगताप, सासरे अजिनाथ देवराव भवर, सासू विजुबाई अजिनाथ भवर आणि मेव्हणा महेश अजिनाथ भवर या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन, आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याप्रकरणी लवकरच आरोपींना अटक करू अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT