चहासाठी काय पण म्हणणाऱ्यांनी एकदा ही बातमी वाचाच Saam Tv
महाराष्ट्र

चहासाठी काय पण... म्हणणाऱ्यांनी एकदा ही बातमी वाचाच

चहाला रंग चांगला येत असल्याने गिऱ्हाईकही भरपूर येत होते.

विश्वभुषण लिमये

सोलापूर: आपण नेहमी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार पहातो, पण सोलापूरमध्ये चहात खाद्यकलर घालून चहा विकला जायचा, चहाला रंग चांगला चांगला येत असल्याने गिऱ्हाईकही भरपूर यायची पण अन्न व औषध प्रशासनाला याची भनक लागली आणि त्यांनी थेट कारखान्यावर धाड मारून चहा जप्त केला आहे.

सोलापुरातील केजीटी चहा कंपनीचा कारखाना सोलापुरमध्ये आहे. याच कारखान्यात चहात भेसळ होत असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाला समजला आणि त्यांनी थेट कारखान्यावर धाड मारून भेसळयुक्त असलेला चहा जप्त केला आहे.

मात्र कारखन्यात काम करणाऱ्या सुपरवायझरच म्हणणं आहे की ते कोणतीही भेसळ करत नाहीत, जे सप्लायर त्यांना माल पुरवतात तसाच माल पॅक करून ते पुढे विकतात, मात्र माल घेताना कोणतीही टेस्ट केली जात नाही. मालाचा कोणताही रिपोर्ट घेतला जात नाही आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी मात्र खेळ केला जातो.

या केजीटी कंपनीचे मालक कृष्ण गोपाळ द्विवेदी हे मूळचे ठाण्याचे आहेत, आणि या कारखान्यात माल येतो तो पुण्याच्या नवरत्न चहा भांडार आणि भुसावळच्या अरिहंत टी कंपनी भुसावळ येथून, कंपनीच्या सुपरवायझरच्या म्हणण्यानुसार जसा माल येतो तसा पुढे पाठवला जातो त्यामुळे या भेसळीमागे पुणे आणि भुसावळ कनेक्शनही समोर येतंय. मात्र अन्न व औषध प्रश्नाच्या अहवाला नन्तरच या गोष्टी स्पष्ट होतील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

SCROLL FOR NEXT