Hingoli Accident Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Accident News : दुचाकीला भीषण अपघात, रुग्णालयात निघालेल्या वृद्ध आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

Father Mother Son dies in Hingoli Accident : वयोवृद्ध आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दुचाकीचा अपघात झाला.

प्रविण वाकचौरे

संदीप नागरे

Hingoli News :

हिंगोलीमध्ये दुचाकी अपघातात संपूर्ण कुटूंब उध्वस्त झालं आहे. आई-वडिलांना दुचाकीवरुन रुग्णालयात घेऊन जाताना झालेल्या अपघातात मुलगा, आई-वडील असा तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील तिघांच्या मृत्यूने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुंडलिक जाधव, कलावती जाधव व मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. आकाश बुधवारी रात्री आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दुचाकीचा अपघात झाला. रात्रीच्यावेळी अपघात झाल्याने घटना उघडकीस आली नाही. सकाळी अपघाताची घटना समोर आली.

दुचाकी एका वळणावरून रस्त्याच्या शेजारील नाल्यात कोसळली आणि तिघेही दुचाकीसह नाल्यामध्ये पडले. मात्र या रस्त्यावरून रहदारी नसल्याने अपघाताची माहिती कुणालाच मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभर मदत मिळाली नाही.

गुरुवारी सकाळी दूध विक्रेते जात असताना हा अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तीनही जणांना या अपघातात मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT