Breaking : तीन महिन्यांच्या मुलीची चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून हत्या! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Breaking : तीन महिन्यांच्या मुलीची चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून हत्या!

एका निर्दयी बापाने पोटच्या तीन महिन्यांच्या मुलीला चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव गावात घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : तीन महिन्यांच्या मुलीला चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खबळ उडालीय. मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव गावातील अविनाश लिंबा चव्हाण असे पोटच्या मुलीची हत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे.

हे देखील पहा :

अविनाश चव्हाण याचा घरासमोर राहणाऱ्या दोन महिलांसोबत वाद झाला. नंतर या वादाच्या रागातून चव्हाण याने आपल्या घरात जाऊन चादरीवर झोपलेल्या आपल्या तीन महिन्यांच्या मुलीच्या पायाला धरून चादरी सह जमिनीवर आपटून तिची हत्या केली.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी राजू मोरे व पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन निर्दयी बापाला अटक केली आहे. घरासमोर झालेल्या वादाचे कारण आणि पोटी आलेल्या दोन्ही मुली असल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बी.पी राऊत हे करत आहेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT