Crime News Saam tv
महाराष्ट्र

Palghar: आधी डोकं आपटलं नंतर गळा आवळून संपवलं, मुलाच्या हत्येनंतर बापानेही गळफास घेतला; पालघरमध्ये खळबळ

Father Kills Son Hangs Self Palghar News: आधी वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या केली, नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

आधी वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या केली, नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि घटनास्थळी पंचनामा केला. तसेच या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मृत मुलाचे नाव आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय वर्ष १५) असून, आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव शरद रघुनाथ भोये (वय वर्ष ४०) असे आहे. शरद भोये हे मुंबईतील बेस्ट सेवेत कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास शरद भोये यांचे वडील रघुनाथ जानू भोये हे पिंपळशेत येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले असता, त्यांना घरात धक्कादायक दृश्य दिसले.

त्यांचा नातू भावेश मृतावस्थेत पडलेला होता, तर दुसऱ्या खोलीत शरद भोये यांनी गळफास घेतलेला होता. या घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्राथमिक माहितीनुसार, शरद भोये यांनी आपल्या मुलाचे डोके जमिनीवर आपटून आणि नंतर गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप शरद भोये यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच मुलाची हत्या का केली याचेही कारण समोर आलेले नाही. पोलिसांकडून भोये कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, अधिक तपास जव्हार पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT