Sangli Saam
महाराष्ट्र

Sangli News: बापाचं सैतानी कृत्य! १३ वर्षीय लेकीवर ४ महिने वारंवार बलात्कार, आईकडून भंडाफोड

Sangli crime news: सांगलीत नराधम बापाने आपल्या १३ वर्षीय लेकीवर ४ महिने वारंवाप लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या १३ वर्षीय लेकीवर बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी परिसरातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

जत पूर्व भागातील एका गावात १३ वर्षीय पोटच्या मुलीवर बापानेच लैंगिक अत्यार केला आहे. असहाय्यतेचा गैरफायदा घेत बापाने मुलीवर अतिप्रसंग केला. नराधम बाप मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत बोता. याची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाली. आईनं बापाला असे कृत्य करण्यास रोखले.

मात्र, वारंवार सांगूनही नराधम बाप काही ऐकत नव्हता. अखेर पीडित मुलीच्या आईने उमदी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने मुलीसोबत घडलेल्या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह आईचा जबाब नोंदवला. तसेच आरोपी बापाला अटक केली.

अटक केल्यानंतर नराधम बापाने आपल्या कृत्याची कबूली दिली. तसेच आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT