Chhatrapati Sambhaji Nagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: इलेक्ट्रिक शिवाई बस अन् कारचा भीषण अपघात; कारचालकाचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी

या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News: अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असलेल्या इलेक्ट्रिक शिवाई बस आणि एका खाजगी कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. (Latest Marathi News)

हा भीषण अपघात मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रस्त्यावरील वाळूजजवळ घडला. सय्यद जावेद सय्यद हनीफ असे मृत कारचालकाचे नाव आहे. सर्वजण एकाच परिवारातले असून बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील हे रहिवासी आहेत अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एसटी (ST) महामंडळाच्या शिवाई बसने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार रस्ताच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. या अपघातात कारचालक सय्यद जावदे सय्यद हनीफ (३३, रा. देऊळगाव मही, जि.बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला.

तर कारमधील ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात कार आणि बस या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT