farmer set fire to bike in hingoli protests against maharashtra government Saam Digital
महाराष्ट्र

हिंगाेली : शेतक-याचा राग अनावर, स्वत:ची दुचाकी पेटवली, कारणंही आलं समाेर (पाहा व्हिडिओ)

farmer set fire to bike in hingoli protests against maharashtra government: विशेष म्हणजे यापूर्वी ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याने अख्खं गाव विक्रीला काढलं होतं.

संदीप नागरे

कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी उपाेषणास बसलेल्या आंदाेलकांची शासन, प्रशासनाने दखल न घेतल्याने हिंगाेली जिल्ह्यातील एका शेतक-याने स्वतःची दुचाकीला आग लावत पेटवून दिली. ही घटना ताकतोडा गावात घडल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावात शेतात पेरणी करण्यासाठी घेतलेले पीककर्ज माफ करावे या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाची सरकार दरबारी अद्याप नोंद घेतली गेलेली नाही.

यामुळे निराश झालेल्या शेतकरी शांताराम सावके यांनी त्यांच्या दुचाकीला आग लावलत पेटवून दिली. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दुचाकी पेटवण्याचा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT