farmers rasta roko at daryapur krushi utpanna bazar samiti  saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Andolan : दर्यापूर बंद, शेतक-यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक रास्ता राेकाे

यामुळे काही वेळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली. शेतक-यांच्या आंदाेलनास दर्यापूर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून मोर्चाला पाठींबा दिला.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवार) दर्यापूर बंद ठेवावे असे आवाहन करण्यात आले. यासाठी शेतक-यांनी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (daryapur krushi utpanna bazar samiti) समोर रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी नेते अभय गावंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडाे शेतकरी दर्यापूर येथे एकटवले. या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दर्यापूर येथे आंदोलन छेडले. यावेळी शेतक-यांनी सरकारच्या धाेरणाविराेधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी शेतक-यांनी सोयाबीन, कापूस, संत्रा,चना व कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी केली. शेकडाे शेतक-यांनी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली. शेतक-यांच्या आंदाेलनास दर्यापूर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून मोर्चाला पाठींबा दिला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT