farmers rasta roko andolan at chhatrapati sambhajinagar paithan road demands water for jayakwadi dam. saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या ! शेकडाे शेतक-यांनी राेखला छत्रपती संभाजीनगर पैठण मार्ग

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी जायकवाडीला पाणी देऊ नये अशी भूमिका घेतली आहे.

डाॅ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajnagar News : समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावे अशी मागणी करत आज (शुक्रवार) पैठण येथे शेकडो शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर पैठण रस्त्यावर रस्ता रोको आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे वाहतुकीचा खाेळंबा झाला. (Maharashtra News)

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam Water Issue) नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यादोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी जायकवाडीली साेडले जाणार आहे. या निर्णयाच्या विराेधात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी साेडलेले गेले नाही.

त्यामुळे मराठवाडा भागातील शेतकरी आज संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतक-यांना शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे मराठवाड्यातल्या जायकवाडीत हक्काचं 8.603 टीएमसी पाणी मिळणे गरजेचे असल्याचे शेतक-यांनी नमूद केले.

दरम्यान हक्काचे पाणी हे समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार पैठणच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावे अशी मागणी करत आज पैठण येथे शेकडो शेतकऱ्यांनी संभाजीनगर पैठण रस्त्यावर रस्ता रोको केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT