- अजय साेनवणे
Onion Price : नाशिक (Nashik) जिल्हयात लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यंदा कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतक-यांना (farmers) हाेती. परंतु शेतक-यांचा अपेक्षा भंग झाला. (Maharashtra News)
कांद्याच्या (onion) दरात सातत्याने घसरण होत आहे. कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदाेलन छेडण्यात आले. तसेच शेतक-यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानीची त्वरीत भरपाई शेतक-यांच्या खात्यात जमा करावी, अल्पदराने विक्री केलेल्या कांद्यास १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे अशा विविध मागण्यांसाठी आज रास्ता राेकाे आंदाेलन (aandolan) करण्यात आले.
हे आंदाेलन चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली चांदवड चौफुली येथील मुंबई-आग्रा महामार्गावर करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे (rasta roko aandolan) वाहतुक खाेळंबली. या आंदोलनापुर्वी बाजार समितीमधील लिलाव देखील आंदाेलकांना बंद पाडले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.