Sucide Farmers daughter अरुण जोशी
महाराष्ट्र

'आई-वडिलांना माझं ओझं नको...' पत्र लिहून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या (पहा व्हिडीओ)

दोन बहिणी, एक लहान भाऊ, अशा सर्वांच्या पोटाचा व भविष्याचा बिकट प्रश्न आहे म्हणून...

अरुण जोशी

अमरावती : ‘आईवडिलांना ओझे नको म्हणून मी हे जीवन संपवित आहे’, अशी चिठ्ठी लिहून एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या (Sucide Farmers daughte) केल्याची ह्रदयद्रावक घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. कोरोना Corona महामारी मुळे कमी झालेला रोजगार तीन वर्षांपासून असलेली नापिकी वडीलांच्या डोक्यावर चढत असलेला कर्जाचा Loan डोॆगर आणि त्यामुळे शाळेत शिक्षण घेण्यासाठीही जवळ पैसे नाहीत म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

पहा व्हिडीओ -

अमरावती जिल्ह्यातील Amravati कुऱ्हा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिदवाडी येथील १७ वर्षीय सेजल गोपाल जाधव (Sejal Gopal Jadhav) या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अवघ्या १७ वर्षीय मुलीच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्या पूर्वी भावनिक चिठ्ठी लिहत तिने यातून मन मोकळे केले. तीन वर्षांपासून सतत नापिकी व कर्ज व शाळेत शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली असे तिने लिहले आहे.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सेजलने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. 'वडिलांना शेतमजुरी व तीन एकर शेती करून उदरनिर्वाह करावा लागतो. त्यात सतत होत असलेली नापिकी व घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य जगणे दिवसेंदिवस कठिण होत आहे. त्यातही दोन बहिणी, एक लहान भाऊ, अशा सर्वांच्या पोटाचा व भविष्याचा बिकट प्रश्न आहे. सध्याची महागाई Inflation व मुलांचे शिक्षण, हे सर्व करीत असताना आईवडिलांना अतोनात त्रास होत आहे. त्यामुळे माझे ओझे कमी व्हावे, याकरिता मी आपले जीवन संपवित आहे,' असे लिहून सेजलने आपल्या घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. कुऱ्हा पोलिसांनी Police घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे आजही आपल्या राज्यासह देशातील शेतकऱ्यांची परिस्थितीचा अंदाज लावू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी शासनाने काहीतरी भक्कम सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Accident News : वाळूने भरलेल्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले, मृतदेहाचे तुकडे, भंडाऱ्यात भयानक अपघात

Ravi Naik passes away : माजी मुख्यमंत्र्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, संपूर्ण गोव्यावर शोककळा

Maharashtra Politics: ३ महिन्यांपासून वकील बेपत्ता, पत्नीचे शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT