Bhandara News saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : ऊसाला दरवाढ न मिळाल्यास कारखाना बंद पाडू; शेतक-यांचा 'मानस'च्या व्यवस्थापनास इशारा

शेतकऱ्यांनी उसाचा दर 2700 रूपये करावे अशी मागणी केली आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमूख

Bhandara News : ऊसाला जादा दर मिळावा यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी आज (गुरुवार) मानस कारखान्यासमाेर आंदाेलन छेडले. यावेळी आंदाेलकांनी घाेषणाबाजी करुन साखर कारखाना परिसर दणाणून साेडला. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे मानस साखर कारखाना आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी याच मानस कारखान्याला अनेक वर्षापासून ऊस देत आहेत. जिल्ह्यात वैनगंगा नदी वाहत असल्याने नदी किनाऱ्यावर असणाऱ्या गावात मोठया प्रमाणात ऊस पिक घेतले जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवसेंदिवस खताचे, मजुरीचे दर वाढले मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे दर वाढले नाही. सन 2018 पासुन 2100 रूपये प्रती टन दर शेतक-यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी अनेकदा उसाचे दर 2700 रूपये करावे अशी मागणी केली.

या मागणीचा साखर कारखाना व्यवस्थापन विचार करीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये माेठी नाराजी आहे. त्यातूनच आज शेतक-यांनी मानस साखर कारखान्याच्या सामोर ऊस दरवाढ करावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. उसाला दरवाढ मिळाली नाही तर कारखाना बंद पाडू असा इशारा देखील शेतक-यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT