Gokul Milk Price Issue : saam tv
महाराष्ट्र

Gokul Milk Price Issue : गायीच्या दुधाला दरवाढ द्या, शेतक-यांनी गोकुळच्या गाड्या अडवल्या

आजच्या आंदाेलनस्थळी दूध उत्पादक शेतक-यांनी नव्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : गायीच्या दूधाच्या दराची अद्याप दरवाढ केली नसल्याने काेल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज (साेमवार) शेतक-यांनी गोकुळ दूध संघच्या चिलिंग प्लॅन्ट येथे आंदाेलन केले. दरम्यान या आंदाेलनाप्रसंगी पाेलीसांचा गाेकुळ परिसरात बंदाेबस्त हाेता. (Maharashtra News)

आजचे आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने उदगाव येथे दूध दरासाठी (milk price) करण्यात आले. यावेळी आंदाेलकांनी गाईच्या दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी घाेषणाबाजी केली. उदगाव येथील गोकुळ चिलिंग प्लॅन्टवरील दुधाच्या गाड्या आंदाेलकांनी अडवल्या. यावेळी पाेलीसांनी आंदाेलकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदाेलन (aandolan) सुरुच ठेवले.

दरम्यान गायीच्या दूध दरात कपात केल्याच्या कारणावरून शनिवारी मनसेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळच्या बिद्री-बोरवडे शितकरण कार्यालयाची तोडफोड केली हाेती.

या घटनेत एक कर्मचारी तसेच अधिकारी किरकोळ जखमी झाले हाेते. या घटनेनंतर मूरगूड पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलकांवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati bypoll : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार, कुणी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

Shocking: बंद घरामध्ये आढळले चौघांचे मृतदेह, दरवाजा तोडताच आतमधील दृश्य पाहून पोलिसही हादरले

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

Jaggery Benefits: पूर्वी बाहेरुन आल्यावर पाहुण्यांना गूळ पाणी का द्यायचे? काय आहेत गूळ पाण्याचे फायदे?

SCROLL FOR NEXT