हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर! SaamTvNews
महाराष्ट्र

हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

अचानक आपल्याला घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर बघून नवरदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : हौसेला मोल नसतं अस म्हणतात,आणि त्यात जर हौशी शेतकरी असेल तर मग विचारूच नका. नाशकात (Nashik) या एका हौशी शेतकऱ्याची सद्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तुम्ही म्हणाल अस काय झालं? अहो या पठ्ठ्याने अवघ्या 5 किलोमीटर वरून आपल्या जावयाला आणण्यास चक्क हेलिकॉप्टरच पाठवलं..!

हे देखील पहा :

नाशिकच्या ढकांबे येथील प्रगतिशील शेतकरी (Farmer) गोपीनाथ बोडके यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचे चिरंजीव संकेत नागरे यांच्यासोबत गंगापूररोड येथील बालाजी लॉन्समध्ये नुकताच विवाह सोहळा (Marriage) पार पडला. हा विवाह सोहळा शाही पद्धतीने तर झालाच. मात्र, यात विशेष म्हणजे नवरदेवाला (Bridegroom) घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर गेलं आणि मग काय नावरेव ही अवाक झाला. अचानक आपल्याला घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर बघून नवरदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

प्रत्येक बापाची इच्छा असते की, आपल्या मुलीचं लग्न दणक्यात झालं पाहिजे आणि हेच गोपीनाथ बोडके यांनी करून दाखवलं. यामुळे त्यांची लाडकी लेक वैष्णवी ही खूप आनंदी झाली. बर इतकंच नाही तर अंतर जवळ असल्याने हेलिकॉप्टर (Helicopter)10 किलोमीटर चा फेरफटका मारून आलं. त्यामुळे हौसेला मोल नाही हेच दिसतंय आणि मग काय आपली लेक आणि जावयाची पाठवणीही हेलिकॉप्टरनेच केली. त्यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या परिसरातही जोरदार रंगलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT