Farmer Saam TV
महाराष्ट्र

Osmanabad News: शेतात पाणी भरायला गेलेल्या पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू, नव्या घरात राहण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं

शरणाप्पा जमादार व गणेश जमादार या पिता-पुत्रांची नावे आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> कैलास चौधरी

उस्मानाबाद : शेतातील विद्युत मोटार चालू करण्यास गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापुर तालुक्यातल्या निलेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. तातील ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे दोघे गेले होते. शरणाप्पा जमादार व गणेश जमादार या पिता-पुत्रांची नावे आहेत.

सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत. त्यातच विजेच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना सगळी कामे सोडून वीज असेल त्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी जावं लागत आहे. हेच आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. (Osmanabad News)

तुळजापुर तालुक्यातल्या निलेगाव येथील शरणाप्पा जमादार व मुलगा गणेश जमादार या पिता-पुत्राचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाला आहे. जमादार यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने लवकर मोटार सुरू करून ज्वारीच्या पिकाला पाणी सोडावे आणि बांधकामावर परत यावे या उद्देशाने हे दोघे गेले होते. मात्र आता नव्या घरात राहण्याचं पिता-पूत्राचं स्वप्नही अपूर्ण राहिलं.

यावेळी गणेश याने मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गणेशला शॉक लागला. यावेळी गणेशला वाचवण्यासाठी गेलेल्या शारणाप्पा यांनाही विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी काल दुपारी घडली असून नळदुर्ग पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT