Tiger Attack News saam tv
महाराष्ट्र

बापरे! झाडाची पाने तोडायला गेला शेतकरी अन् वाघाने केलं होत्याचं नव्हतं

वाघाच्या हल्ल्यामुळं गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश भांडेकर

गडचिरोली : जिल्ह्यात वाघांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला. आरमोरी शहाराजवळ असलेल्या रामाळा येथे ही थरारक घटना घडली. शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली शिंदी वृक्षाची पाने तोडण्यासाठी एक शेतकरी जंगलात गेला होता. त्यानंतर समोरून (Tiger Attack) येणाऱ्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घातली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आनंदराव दुधबळे असं मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. या धक्कादायक घटनेमुळं येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Farmer died in tiger attack in gadchiroli)

मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी देशपूरमध्येही वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठेमाजी आत्रामचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला.

या हल्ल्यातली शेतकरी आनंदराव दुधबळे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं खळबळ माजल्याने नागरिकांमध्ये वन विभागा विरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे आररमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार गजबे यांनी गावे हल्लामुक्त करण्याची मागणी अधिकाऱ्यांना केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT