Phaltan Krushi Utpanna Bazar Samiti News : एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असताना साताऱ्यातील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र भलताच प्रकार घडला आहे. बाजार समितीत टॉमेटोला योग्य भाव मिळत नसल्याने चिडलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)
सागर देशपांडे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. तो काही टॉमेटोची कॅरेट घेवून बाजार समितीमध्ये आला होता. यावेळी त्याला बाजार समिती मध्ये दलालाकडून 60 किलोचा भाव देण्यात आला.
यावर चिडलेल्या या शेतकऱ्याने बाहेर रस्त्यावर किरकोळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना 60 रुपये पावशेर टॉमेटोला भाव मिळतो आहे मग आमच्या टॉमेटोला (tomato) किलोला 60 रुपये भाव देवून आमची चेष्टा केली जाते आहे असा आरोप करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या शेतकऱ्याने काही नागरिकांना बाजार समितीत आणलेला माल फुकट देखील वाटून टाकला. आज शेतात काम करणाऱ्या महिलांची मजुरी देण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. दरम्यान फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीत गोंधळ घातला म्हणून या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.